Boston मध्येच असताना एका विकएंडला आम्ही आमचे स्नेही कृष्णकांत चव्हाण यांच्याकडे Andover इथे राहायला गेलो . तिथे त्यांची पत्नी आणि दोन गोड मुलं यांच्यासोबत दोन दिवस खूप छान गेले .
तर दुसऱ्या एका long विकएंड ला New York मध्ये विराज ( सतीशच्या पुतण्या ) कडे Manhattan ला जाऊन आलो .
NewYork म्हणजे दुसरी मुंबईच .
अतिशय fast life , प्रचंड गर्दी , ट्राफिक , घाण आणि कचरा ( मुंबई पेक्षा अर्थातच खूप कमी ) असलेली स्टेशन्स आणि अगदी भिकारी सुद्धा ( homeless असतात म्हणे ते ) .

भिकारी म्हणजेच homeless हे पर्यायाने आलंच , ते वेगळं का सांगावं लागतं असा विचार मनात आला .
तर असं कळल तेही आधी मोठ्या घरात राहायचे .
गाडी , टीव्ही , फ्रीज , ए / सी सगळ असत त्यांच्याकडे पण काही कारणाने ( म्हणजे बहुतेकदा drugs किंवा चंगळखोरी ) घराचे कर्जाचे हफ्ते भरू न शकल्याने त्यांची घरं जप्त केली जातात आणि एका रात्रीत ते बेघर होऊन रस्त्यावर येतात .
मला तरी हे ऐकून आपलेच भिकारी बरे वाटले .
निदान ते खरेखुरे गरीब असतात .
अशी उधळपट्टी करून तरी त्यांना रस्त्यावर यायची पाळी आलेली नसते .

Manhattan मध्ये अक्षरशः अडीच दिवसात विराजने जीवाचं रान करून आम्हाला Times Square , Broadway , Rockefeller , Grand Central terminal , Hudson Yards , The Highline , Vessel , Central park , Manhattan square park , Occulus , Chealsea market वगैरे सगळीच मुख्य ठिकाणं दाखवली .
आम्ही Manhattan ला पोचलोच शुक्रवारी रात्री दहा च्या सुमाराला ....
त्यानंतर आम्ही Times Square , Broadway , Rockefeller , Grand Central terminal ह्या सर्व ठिकाणांना अक्षरश: धावती भेट दिली .......

Broadway म्हणजे Manhattan मधला एक भला मोठा रस्ता .
तिथे Lion King , Beauty and the beast , King kong , Phantom of the Opera हे व इतर अत्यंत गाजलेले shows सतत चालू असतात .

Broadway आणि 7th Avenue रोड च्या जंक्शन ला Times Square म्हणतात .
संपूर्ण जगभरातल्या पर्यटकांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे पर्यटन स्थळ .
पाहावं तिथे उंचच उंच गगन चुंबी इमारती .
इमारतींवर मोठमोठाले आकर्षक digital boards लावलेले आणि त्यावर सतत कोणती न कोणती जाहिरात सुरु .
तिथल्या लखलखाटाने डोळे दिपून जात होते .
एक दृश्य बघे पर्यंत दुसरं लक्ष वेधून घेत होतं .
इथे मधोमध एक उंच चबुतरा होता जिथे जावून सगळे आपापले फोटो काढत होते .
तिथे जायला लांबच्या लांब रांग लागली होती .
आम्ही तिथे जवळ जवळ रात्रीच्या बारा साडे बारा वाजता पोचलो असू .
पण त्या वेळीही पाहावं तिथे उत्साही माणसांची झुंबड उडालेली दिसत होती .
हजारो लोक घोळक्याने तिथे रमत गमत फिरत होते .
इथे दिवसा किती गर्दी असेल याचा अंदाजही करवत नव्हता .

Rockefeller – हे इथलं आणखी एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ .
Christmas च्या वेळी इथली सजवलेली Christmas tree ( हि म्हणे ९० फुटा पेक्षा जास्त उंचीची असते ) बघायला संपूर्ण जगभरातून लोकं येतात .
इथलं Christmas celebration आणि त्यावेळची इथलि सजावट अवर्णनीय असते म्हणे .

इथल्या रस्त्यांवर आम्ही रात्री एक दीड पर्यंत मनसोक्त फिरून आजूबाजूच्या आकर्षक इमारती , चर्च वगैरे पहिली .
इथे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठी आकर्षक शिल्प बनवलेली आहेत .
नंतर हलाल कार्ट वर तिथलं सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड खाल्लं आणि साधारण दोन अडीच च्या दरम्यान Grand Central terminal ह्या भव्य स्टेशन वरून मेट्रो पकडून घरी परतलो .

दुसऱ्या दिवशी शनिवारी आम्ही भटकंतीची सुरुवात Central park पासून केली .
जवळ जवळ ८५० एकर जागेवर हे अत्यंत मोठ आणि हिरवळीने भरलेलं अतिशय सुंदर पार्क बनवलेलं आहे .
ह्या पार्क मध्ये zoo , museum , theatre वगैरे अनेक गोष्टी आहेत .
मधोमध एक सुरेख तळ आहे .
इथे असंख्य चित्रपटांचं शुटींग झालेलं आहे .
इथे भटकायला संपूर्ण दिवस देखील कमी पडला असता .
पण वेळ कमी असल्याने आम्ही एक तासाची open rikshaw tour केली आणि पार्क फिरून आलो .

त्यानंतर पहिली एक अतिशय आश्चर्यकारक अद्भूत वाटावी अशी रचना .
ह्याला Vessel म्हणतात .
लांबून एखाद्या मधाच्या पोळ्या सारखा छोट्या छोट्या cells चा दिसणारा तो विलक्षण डोलारा बघून आम्ही थक्क झालो .

तिथून मग आम्ही Highline park ला फिरायला गेलो .
हा खरतर पूर्वीच्या काळचा रेल्वे track .
पण आता तिथे दोन्ही बाजूंना सुरेख वृक्ष , फुलझाडं लावली आहेत .
अवतीभवती सुरेख हिरवळ आहे .
पण ह्या Highline च मुख्य वैशिष्ट्य म्हणजे track च्या दोन्ही बाजूला अतिशय आगळ्या वेगळ्या धाटणीच्या इमारती बांधलेल्या आहेत .
वास्तुशिल्पाचे अनेक आश्चर्य कारक नमुने आम्ही तिथे पहिले .
जवळ जवळ दोन सव्वादोन किलोमीटर अंतर आम्ही हे नेत्रसुख पुरेपूर उपभोगलं .

तिथून मग Chealsea market मध्ये गेलो .
पूर्णपणे बंद असलेल्या ह्या ठिकाणी दोन्ही बाजूला खायची आणि इतर वस्तूंची , कपड्यांची दुकानं होती .
इथले लोण्यासारखे मऊ , तोंडात घालता क्षणी विरघळणारे प्रसिध्द crepes with maple syrup खाऊन तृप्त झालो .

नंतर Manhattan square park , Iron building , Empire State building ह्या ठिकाणांना धावती भेट देवून आम्ही त्या दिवसाची भटकंती थांबवली .
सतीशचा भाचा अमित आणि त्याची फेमिली सुद्धा आमच्या बरोबर होतीच .
त्याच्या बरोबर रविवारी आम्ही नवीन World trade centre ची बिल्डींग , One Observatory , World Trade Memorial , Wall Street आणि Brooklyn bridge पाहिला .

World trade centre च्या नवीन इमारतीत १०२ मजल्यावर असलेल्या One Observatory मधून संपूर्ण New York चं अतिशय सुरेख दर्शन घडतं .
अमित ने आमच्यासाठी जी तिकीट काढलेली त्यात आम्हाला प्रत्येकाला एक एक IPad सुद्धा दिलेलं ज्यात आम्ही Observatory मधून बाहेर दिसणाऱ्या कोणत्याही स्थळाविषयी किंवा इमारतीविषयी माहिती ऐकू शकत होतो .
त्यामुळे बाहेर दिसत असलेल्या प्रत्येक गोष्टीची detailed माहिती कळत होती आणि खरी मजा लुटता येत होती .

नवीन World trade centre च्या बाजूलाच आधीच्या twin towers च्या ठिकाणी आता World Trade Memorial बांधलेले आहे .
आतंकवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या मृतांच्या स्मरणार्थ तिथे दोन तलाव बांधलेले आहेत आणि सर्व मृतांची नावे कोरलेली आहेत .
तिथलं वातावरण अतिशय शांत गंभीर होतं .
एक दोन ठिकाणी त्या दिवशी जन्मदिवस असलेल्यांच्या नावावर पुष्पगुच्छ ठेवलेले दिसत होते .
तिथली शांतता जीवघेणी होती .
इतक्या वर्षानंतरही तो तलाव बघताना जीवाची कालवा कालव झाली .
त्या दिवशी , त्या वेळी , इथे , ह्याच जागी काय गोंधळ माजला असेल , कैक निष्पाप जीव सैरावैरा प्राण वाचवायला धावले असतील आणि काही कळायच्या आधीच प्राणांना मुकले असतील हा नुसता विचार सुद्धा अस्वस्थ करणारा होता .
इथे खूप वेळ थांबणं अशक्य होतं .

इथून आम्ही जवळच असलेल्या विश्वप्रसिद्ध Wall Street वर गेलो तिथला ब्राँझ चा बैलाचा ( Charging Bull ) पुतळा पाहायला .
American Stock Exchange व इतर अनेक प्रसिध्द आर्थिक व गुंतवणूक कंपन्या इथे असल्याने Wall Street ला एक संपूर्ण विश्वात एक वेगळंच महत्त्व आहे .
ह्याच Wall Street वर मिनिटा मिनिटाला होणाऱ्या करोडो डॉलर्स च्या उलाढालीवर विश्वातील अनेक राष्ट्रांचे आर्थिक भवितव्य अवलंबून आहे .
इथला ब्राँझ चा जवळ जवळ ३००० किलोचा आणि अकरा फुट उंचीचा हा बैला चा पुतळा बघायला जगभरातून लोक गर्दी करतात .
पण आम्ही गेलो त्यादिवशी तिथे मरणाची गर्दी होती .
इतकी कि शेवटपर्यंत आम्हाला अख्खा बैल पहायला मिळालाच नाही .

तिथून आम्ही गेलो Brooklyn bridge पाहायला .
इथेही अफाट गर्दी .
शिवाय आम्ही संध्याकाळी पाच वाजता इथे पोचलेलो आणि साडेपाच वाजता पाऊस पाडणार होता .
पाचच वाजलेले असूनही अंधारून आलं होतं . ( इथे या काळात रात्री नऊ पर्यंत उजेड असतो ) .
आजूबाजूचे विक्रेते आपापली दुकानं बंद करण्याच्या कामाला लागलेली .
आम्ही बाजूच्याच stall वरून एक मोठा स्ट्रोबेरी आईसक्रीम कोन घेतला आणि गर्दीसोबत ब्रुकलीन ब्रिज पर्यंत जावून आलो .
परतताना मात्र पावसाचे टपोरे थेंब पडू लागले आणि सर्वांचीच धावपळ सुरु झाली .
मग पाऊस टाळायला सरळ Occulus Mall मध्ये घुसलो .

Manhattan मध्ये आम्ही पहिल्या दिवशी रात्री दीड वाजता तिथल्या Halal Cart वरच अत्यंत लोकप्रिय streetfood चिकन रोल्स खाल्ले .
दुसऱ्या दिवशी Ippudo मध्ये अप्रतिम अशा चवीचं Ramen ( जपानी पदार्थ ) खाल्लं .
Lady M चे crepe cakes , Bouchon Bakery मधले strawberry , oreo आणि pistachio macarons खाल्ले .
Eataly मध्ये अतिशय चविष्ट वांगी आणि मश्रूमचे पिझ्झा आणि काही डेझर्ट varieties चाखल्या .
तिसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी बॉस्टन ला परत जायला निघायच्या आधी विराजने स्वतः बनवलेला पूर्णपणे Jewish Brunch सुद्धा अफलातून होता . आम्ही फक्त अडीच दिवसात एवढं सगळं कसं काय पाहिलं आणि खाल्लं असेल हा विचार आता हे लिहिताना मनात येतोय .

© नयना पिकळे
( क्रमशः )
( क्रमशः )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा