बॉस्टन मधल्या थंड वातावरणामुळे असेल किंवा अर्चित भेटल्यामुळे असेल पण दिवसभर फिरून घरी आल्यावरही थकवा अजिबात जाणवायचा नाही .
त्यामुळे रोज रात्री सुकं मटण , भरलं पापलेट , prawns fry , पावभाजी , मिसळ , पाणिपुरी , शेवपुरी , दहीबटाटा पुरी पासून अगदी बटाटे वडे , कांदा भजी सकट आणि रव्याच्या लाडवा पर्यंत सगळे पदार्थ बनवले आणि एकत्र आनंदाने बसून सर्वांनी धम्माल करत यथेच्छ हाणले .
अमेरिकेत प्रत्येकाची घरं पाहण्यासारखी होती .
घर असो कि apartment , मागे पुढे lawns , आजूबाजूला लावलेली झाडं , फुलझाडं .
Lawns मध्ये इथून तिथे धावणारी भित्रट हरीणं आणि तपकिरी ससे आणि धिटुकल्या खारुताईंचा सुळसुळाट .
सर्वच मनाला सुखावत होतं .

तिथली स्वच्छता , शिस्त , प्रदूषण विरहित वातावरण खरंच वाखाणण्याजोगं आहे .
रस्त्याच्या कडेचे फुटपाथ हे फक्त आणि फक्त फूटपाथ म्हणूनच वापरले जातात .

सुरुवातीला रस्ते ओलांडताना गाडी पाहिली कि आम्ही फुटपाथ वर थांबायचो .
पण आम्हाला बघून सिग्नल असो नसो गाडीवान हि थांबून आम्हाला रस्ता क्रॉस करायला सांगत असे .
नंतर नंतर याची इतकी सवय झाली कि परतायचे दिवस जवळ आले तसा माझ्या मनात विचार आला कि ह्या सवयीमुळे चुकून मुंबईलाही असंच रस्ता क्रॉस करायला गेले तर देव माझं भलं करो .

स्वच्छतेचं बाळकडू तिथे प्रत्येकाला जणू जन्मतःच पाजलं जातं .
आपले भारतीय नागरिकही तिथे गेल्यावर तिथली शिस्त काटेकोर पणे पाळतात .
अर्थात तिथल्या कठोर कायद्याच्या भीतीने .
आणि हीच माणसं भारतात परत आली कि जैसे थे होतात आणि कौतुक मात्र अमेरिकन स्वच्छतेच करतात .
आपणही जर मनापासून हि शिस्त अंगवळणी पाडली तर भारताचंहि नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही .

इथे वस्तू रद्दीत द्यायची म्हणजे सोप्पं काम नव्हे .
रद्दीवाल्याला बोलावून वर आपणच त्याला वस्तू न्यायचे पैसे द्यावे लागतात .
मला पेपरची रद्दी विकून लहानपणी खाल्लेली भेळ आणि उसाचा रस आठवला .
Boston आणि Manhattan ला जागोजागी donation boxes ठेवलेले पाहिले .
तिथे नको असलेले कपडे व इतर वस्तू नेऊन ठेवायच्या कि गरजू व्यक्ती तिथून घेवून जाते .
काहीजण तर अगदी नको असलेले टीव्ही आणि फ्रीज सुद्धा आपल्या घरासमोर ठेवतात .
खुपदा ते चांगल्या स्थितीतलेही असतात म्हणे .

इथले रेस्टरूम्स सुद्धा अतिशय स्वच्छ .
मात्र एवढ्या शिस्तप्रिय , स्वच्छताप्रेमी अमेरिकनांना बाहेरून आल्यावर पाय धुवायची मात्र अजिबात सवय नाही हे पाहिल्यावर खूपच आश्चर्य वाटलं .
फिरून आल्यावर पाय धुतले नाहीत तर मला घरात फिरणं अवघड जातं .
मग मी तिथे खूपदा बाथटब मध्येच उभं राहून पाय धुवायचे तेव्हा कुठे स्वच्छ वाटायचं .
बहुतेक तिथे घरं आणि अगदी फ्लोरिंग सुद्धा लाकडाचं असत म्हणून असे मुबलक पाणी असूनही प्रत्येककडे टिशूपेपर्स वापरतात .

Boston मध्ये मजा म्हणून आम्ही अनेक शॉपिंग मॉल्स व दुकानं फिरलो ( Burlington mall , TJ Maxx , Williams Sonoma , Crate n Barrel , Macy’s , Primark , Target ) .
पण तिथे जे आहे ते सगळंच आता आपल्या इथेही मिळत असल्याने तिथल्या कोणत्याही वस्तूच नाविन्य मात्र वाटलं नाही .

लोकल तसच इंडियन ग्रोसरी स्टोर्स आणि फूड मार्टस देखील भरपूर पाहिली . ( Wallmart , Wagmen’s , BJ’s , Shaw’s , Raja Rana , Spiceland , Fresh Market ) .
जिथे जावू तिथे इतक्या विविध फ्लेवर्सची आईसक्रीम , कुकीज , वॅफल्स , डोनट्स , प्रेत्झेल्स , मॅकॅरून्स , पेस्ट्रीज , चीजकेक्स कि काही विचारू नका .
सतीश गोडखाऊ असल्याने आम्ही जिथे जिथे गेलो तिथे सर्वांनी आग्रहाने आणि कौतुकाने तिथले लोकप्रिय गोड पदार्थ खायला आम्हाला नेलं .

काही ठिकाणी फिरताना आम्हीही काही नवीन दिसलं कि लगेच ट्राय करत होतो .
इथल्या आईस्क्रीम ची गंमत म्हणजे इथे large , medium , small आणि micro असे चार साईजचे आईसक्रीम कप्स मिळतात .
आणि त्यांचा micro cup सुद्धा आपल्या नॉर्मल कप पेक्षा जरा मोठाच असतो .
शिवाय घ्यायच्या आधी फ्लेवर ट्राय करायला मागितल तर जे चमचा भरभरून आईसक्रीम देतात ते एवढं असत कि चार पाच फ्लेवर नुसते टेस्ट करूनच पोट भरेल .

फूड मार्ट मध्ये सुद्धा रसरशीत ताज्या रंगीबेरंगी भाज्या .
आपल्या ओळखीच्या कोबी , फ्लॉवर , ढब्बू मिरची सोबत त्यांचे आर्टीचोक्स , ब्रुसेल्स , विविध प्रकारचे मश्रुम्स , अनोळखी पालेभाज्या सगळं बघत राहावंसं वाटतं .
फळांमध्ये संत्र , अननस , केळी आणि सफरचंद या आपल्या ओळखीच्या फळांबरोबर रासबेरी , क्रॅनबेरी , ब्लुबेरी , स्ट्राॅबेरी , चेरी , प्लम्स , पिचेस , एप्रीकॉट्स अशी सुरेख फळं एकमेकांना खेटून बसलेली असायची .
आम्ही तिथे हि सर्वच फळ अगदी मनसोक्त खाल्ली .

आंबे मात्र तिथे Mexico चे येतात .
हे आंबे मोठाले थोडे गोड होते पण चवीच्या बाबतीत आपले हापूस आणि पायरी सोडाच पण अगदी दशेरी आणि तोतापुरीच्या जवळपासही न फिरकणारे .

प्रचंड उत्सुकतेने तिथलं इंडियन ग्रोसरी शॉप बघायला गेले . आणि जे दिसलं ते पाहून चाट पडले .
अगदी भारतात सुद्धा सगळीकडे सहज न मिळणाऱ्या गोष्टी इथे दिसल्या .
कोल्ड सेक्शन मध्ये अगदी अळूवडी , उंदियो आणि उत्तप्पा इडली च्या पीठा पासून , ओलं खवलेल खोबरं पण होतं .
तिथल्या शेल्फ्स वर आमसूलं आणि ओली आंबे हळद बघून तर मला हर्षवायू व्हायचाच काय तो बाकी राहिला होता .

रसमलाई आणि गुलाबजामच्या पाकिटांच्या बाजूलाच दिमाखात नांदणारी जिलेबी आणि श्रीखंडाचे डबे बघून मन भरून आलं .
अर्चित नेहेमी सांगायचा कि आई इथे सगळं मिळत काहीच पाठवू नकोस पण माझाच विश्वास बसायचा नाही .
आता मात्र हे सगळ स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर निश्चिंत झाले .

एकूण आमचा संपूर्ण महिना अतिशय packed पण well planned असल्याने कुठेही काहीही त्रास न होता खूप छान गेला .
फक्त ह्या भेटीत New Jersey आणि Boston मधली मंदिरं पहायची इच्छा राहून गेलं , नाही म्हणायला Andover ला जाताना वाटेत एक काली मातेचं मंदिर अगदी लांबून दिसलं तेवढंच .
असंख्य कारणांसाठी अविस्मरणीय ठरलेली हि अमेरिका ट्रीप कायम हृदयाच्या सर्वात जवळ राहील हे मात्र नक्की .

© नयना पिकळे
( अमेरिका वारी कथन सुफळ संपूर्ण🙏🏻🙏🏻
( अमेरिका वारी कथन सुफळ संपूर्ण🙏🏻🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा