बॉस्टन ला असताना प्रत्येक विकएंडला अमित ( सतीश चा भाचा ) आम्हाला काही ठिकाणी घेऊन जायचा . त्याने आम्हाला Breaker’s Mansion , Harvard University , USS Constitution museum , MIT आणि Bunker hill monument ह्या ठिकाणी फिरवून आणलं .
Breaker’s Mansion –
एका शनिवारी आम्ही सगळे भाच्याच्या गाडीतून Rhodes Island ह्या state मध्ये असलेल्या New Port ह्या गावी जायला निघालो .
तिथे शंभर दीडशे वर्षापूर्वीची भव्य अशी काही Mansions आहेत .
बघताना आपल्या जयपूर उदयपूरच्या राजवाड्यांची आठवण येते .

आम्ही फक्त Breakers Mansion जे सर्वांत लोकप्रिय आणि मोठ आहे तेच पाहिलं .
Breakers Mansion हे १८९५ च्या सुमाराला बांधलेलं त्या काळच्या अत्यंत श्रीमंत अशा Vanderbilt कुटुंबाचं Summer Home .
ह्या पाच मजली भव्य इमारतीत जवळ जवळ ७० खोल्या आहेत .
त्यांचे भव्य हा शब्द देखील थिटा पडतील असे दिवाणखाने , मोठमोठाले शयनकक्ष पाहून थक्क झाले .
त्यांची न्हाणीघरे आपल्या अख्ख्या घरापेक्षाही खूपच मोठी होती .
स्वयंपाककक्षातील ( हा देखील प्रचंड मोठाच ) त्या काळची पितळेची चकचकीत भांडी डोळे दिपवत होती .
इथे gas किंवा शेगडी ऐवजी अख्खा platform cast iron चा होता .
म्हणजे हा संपूर्ण platform हीच त्यांची शेगडी .

तिथे कळलेली एक गोष्ट मात्र मनातून जायला तयार नाही .
ती ही कि एवढ्या मोठ्या mansion चा मालक Cornellius Vanderbilt हा स्वतः मात्र तिथे फक्त एकच वर्षाच्या summer मध्ये राहू शकला .
त्याचे १८९९ मध्ये वयाच्या अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी निधन झाले .
नशीब म्हणतात ते यालाच . असो .

संपूर्ण mansion बघून तिथून निघायला आम्हाला दुपारचे अडीच वाजले .
सर्वांना प्रचंड भुका लागलेल्या .
Newport हे sea food साठी प्रसिध्द आहे .
मग तिथल्या Anthony’s Seafood मध्ये ( हे आपल्या इथल्या धाब्या सारखं छोटसं पण अतिशय लोकप्रिय हॉटेल होतं ) आम्ही विविध मांसाहारी पदार्थ चाखले .
सगळेच प्रकार एकदम फ्रेश आणि गरमागरम असल्याने आवडीने खाता आले .
पण सोबत वेगवेगळे sauces होते , आपल्यासारखे चमचमीत मसाले नाही .

Harvard University -
असंच दुसऱ्या एका विकएंड ला सकाळीच आम्ही Burlington च्या अमित च्या घरासमोरून बस पकडून Alewife स्टेशन वर गेलो आणि तिथून Red line ने Harvard University पाहायला गेलो .
Harvard ची एक विद्यार्थिनीच इथे आमची टूर गाईड होती .
तिने संपूर्ण परिसर फिरवून तिथल्या महत्त्वाच्या इमारती दाखवल्या , सगळी माहिती दिली .
इथे आम्ही Bill Gates आणि Mark Zukerburg ( हो हो आपला झुक्याच ) हे दोन प्रसिद्ध Harvard dropouts तिथे शिकत असताना कुठे राहायचे ते पाहिलं आणि अभिमानाने त्यांच्या होस्टेल समोर उभं राहून फोटोही काढला .

दुपारी तिथे जवळच असलेल्या एका Chutneys नावाच्या Indian food outlet मध्ये naanini नावाचा अतिशय चविष्ट पदार्थ खाल्ला .
आपल्या भारतीय नान मध्ये चिकन टिक्का चं फिलिंग भरून ते sandwich सारखं ग्रील केलं होतं .
तिथला सामोसा चाट सुद्धा अतिशय सुरेख होता .

जेवल्यावर तोंड गोड करण्यासाठी बाजूच्याच Mike’s मध्ये Canoli हा स्वीट रोल सारखा नवीन पदार्थ खाल्ला .
१९४६ साली चालू झालेलं हे outlet म्हणजे बॉस्टन मधले Original Home of Canoli आहे असा त्यांचा दावा आहे .
पोटोबा झाल्यावर परत आमची भ्रमंती सुरु झाली .

दुपारनंतर आम्ही USS Constitution museum ला गेलो .
USS Constitution हे बहुतेक संपूर्ण जगातील सर्वात जुनं Naval जहाज असून एकोणिसाव्या शतकातील अनेक महत्त्वाच्या युद्धात ह्या जहाजाचा सक्रीय सहभाग होता .
विसाव्या शतकात जेव्हा हे जहाज निवृत्त घोषित केलं तेव्हा त्यावरच म्युझियम बांधलं गेलं .
आजही हे जहाज उत्तम स्थितीत असून वर्षातून ३/४ वेळा समुद्रात एक फेरफटका मारण्यासाठी नेण्यात येतं .

ह्या जहाजाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या तळाशी तीन मजले असून ते अत्यंत सुस्थितीत आहेत .
प्रत्येक मजल्यावर जहाजाचा कॅप्टन , वरिष्ठ अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी राहायला खोल्या आहेत .
साठवणीची कोठारे आहेत .
अगदी करमणुकीसाठी विविध बैठ्या खेळांसाठी सुद्धा वेगवेगळ्या खोल्या आहेत .

आम्ही गेलो त्यादिवशी संपूर्ण जहाज अतिशय सुरेख सजवलं होतं .
Navy चे अनेक वरिष्ठ अधिकारी आपापल्या युनिफॉर्म मध्ये तिथे जमत होते .
पर्यटकांना जहाज पाहायला , फिरायला पूर्ण मुभा होती पण त्यातही एक शिस्त पाळली जात होती .
सगळ वातावरण अत्यंत formal वाटत होतं .
चौकशी केली असता कळल कि संध्याकाळी सहानंतर तिथे Navy च्या विद्यार्थ्यांची graduation ceremony होणार होती .

MIT ( Massachusets Institute of Technology )
इथे सुद्धा आम्ही गेलो त्याचं दिवशी graduation ceremony चालू असल्याने पार्किंग अजिबात मिळालं नाही .
मग खाली न उतरता कार मधूनच MIT ला वळसा घालून तो परिसर पहिला .

त्यानंतर जवळच असलेलं Bunker hill monument पाहिलं .
हे US मधलं सर्वात पहिलं monument मानलं जातं .
ब्रिटिशर्स आणि अमेरिकनांच्या मध्ये १७७५ साली Bunkerhill इथे झालेल्या पहिल्या युद्धाच प्रतिक म्हणून हे बांधलेलं आहे .

इथे फिरायला आलेल्यांच वागणं अतिशय संयमित होतं .
कुठेही गोंगाट , खिदळण नाही .
आपल्या पूर्वजां प्रति आदर व्यक्त करण्याची ती पद्धत खूप आवडली .

बॉस्टन मध्ये फिरताना , ह्या सर्व इमारती , म्युझियम्स , युनिव्हरसिटीज पाहताना एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे अमेरिकनांना आपल्या प्रत्येक गोष्टीचं प्रचंड कौतुक आहे .
सर्वच ठिकाणी , मग त्याचे महत्त्व कमी असो कि जास्त त्यांनी पर्यटकांची ये जा चालू राहील अशीच सोय केलेली आहे .

एखाद्या patriot चा पुतळा असो कि पब्लिक गार्डन मधले duckings चे पुतळे , प्रत्येक गोष्टीची जास्तीत जास्त जाहिरात करून आपल्या पर्यटनात भर पाडलेली आहे .
त्यांच्या बॉस्टन tours मध्ये तर अगदी महत्त्वाचे रस्ते , मार्केट , एखादं १०० वर्ष जुनं झाड सुद्धा आवर्जून बस थांबवून दाखवतात .
हे सगळं पाहून वाटलं कि जेमतेम २५०/३०० वर्षांचा इतिहास असूनही हे अमेरिकन्स , पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इतके प्रयत्न करतात .
मग आपण भारतीयांनी ठरवलं तर आपल्याकडे तर अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याचा आपण सार्थ अभिमान बाळगू शकू .
पण भारताकडे हजारो वर्षांचा सांस्कृतिक ठेवा असूनही आपला देश आजही दुर्लक्षित आहे .
अर्थात भारताच्या प्रगतीच्या आड गरिबी आणि अफाट लोकसंख्या हे दोन घटक नेहेमीच येतात हे नजरेआड नाहीच करता येत .
पण निदान देशाच्या पर्यटन विभागाने जर हि गोष्ट मनावर घेऊन निदान काही महत्त्वाच्या स्थळाचं सुंदरीकरण केलं तर पर्यटन वाढून देशाला याचा नक्कीच खूप फायदा होईल .

© नयना पिकळे
( क्रमशः )
( क्रमशः )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा