आम्ही आमच्या बॉस्टन मधल्या तीन आठवड्याच्या वास्तव्यात वेगवेगळ्या दिवशी आम्ही Museum of Science , Museum of Fine Arts , Boston Tea party museum व इतरही काही मुझियम्स पाहिली .
Museum of Science -
हे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेलं बहुतेक बॉस्टन मधलं सर्वात जुनं मुझियम .
इथे विज्ञान विषयक असंख्य गोष्टी पाहायला मिळतात . इथे अनेक दुर्लभ , नष्ट होण्याच्या verge वर असलेल्या आणि नष्ट झालेल्या पक्षी व प्राण्यांच्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत .
त्यांच्याविषयी दिलेल्या लेखी माहिती बरोबरच ती ऐकण्यासाठी प्रत्येक डिस्प्ले च्या बाजूला ऑडियो एक्विपमेंट आणि त्या त्या जनावरांच्या भोवतालच्या वातावरणाचा अंदाज यावा म्हणून तिथला गंध देखील अनुभवता येत होता . हा concept नाविन्यपूर्ण वाटला .

इथे लहान वयाच्या मुलांसाठी अनेक activities आहेत .
शाळेतील मुलांना वर्षातून तीन चार दा ह्या मुझियम मध्ये आणून शाळेत शिकवलेल्या विज्ञान विषयक गोष्टींचं प्रात्यक्षिक दाखवल जातं .
इथले instructors आलेल्या मुलांना अतिशय मनापासून प्रत्येक गोष्ट दाखवतात , त्या विषयी समजावून सांगतात , वेळ प्रसंगी त्यांना हाताळायला सुद्धा देतात .
शिकवायची पद्धत इतकी सुंदर असेल तर अगदी कुणालाही शिक्षणाची गोडी लागेल .

इथे लहान मुलांसाठी Butterfly garden , Magic tree house , Small foot , Splash and Bubbles तर मोठ्यांसाठी Shark show , The great barrier reef , Volcanoes , Undiscovered World असे अतिशय सुरेख छोट्या छोट्या कालावधीचे कार्यक्रम देखील ठेवलेले आहेत .
आपल्याकडे चिमण्या चिवचिवाट करतात तसाच मुझियम बाहेरच्या हिरवळीवर मोठ्या प्रमाणात रॉबिन पक्ष्यांचा त्यांच्या विशिष्ट आवाजात किलबिलाट सुरु होता .

Museum of Fine Arts -
बॉस्टन मधलं दुसरं प्रसिद्ध मुझियम म्हणजे Museum of Fine Arts .
हे बघायला आम्ही आमच्या तिथल्या वास्तव्याचे अगदी शेवटचे २ दिवस असताना गेलो आणि खूप पस्तावलो .
एक तर ते इतक प्रचंड मोठं आहे कि एका दिवसात बघता येणं अशक्यच . आणि एखादा कलेचा रसिक तर महिनाभर आरामात रमेल तिथे .
कारण ह्या मुझियम मध्ये जवळ जवळ साडेचार लाखाच्या वर paintings , sculptors आणि इतर art displays आहेत .

मुझियम च्या ह्या भव्य विस्तारामुळेच बहुतेक तिथे येणाऱ्या प्रत्येकाला एकाच तिकिटात आठवड्यातून आणखीन दोन वेळा परत मुझियमला भेट द्यायची परवानगी मिळते .
आम्हाला मुझियम मध्ये शिरताच एक पत्रक देण्यात आलंं ज्यात तिथल्या सर्वात लोकप्रिय अशा किमान बारा गोष्टी तरी बघाव्यात म्हणून एक लिस्ट दिली होती आणि तिथे कसं जायच याचा नकाशा व gallery नंबर दिला होता .

आम्ही मग फक्त ह्या १२ गोष्टीच बघायचा निर्णय घेतला कारण तिथे जाताना वाटेत ती प्रत्येक gallery सुद्धा बारकाईने पाहणं आलंच .
कारण कितीही म्हटलं तरी सर्वच गोष्टी इतक्या सुरेख होत्या कि काही मधल्या गोष्टी टाळून झपाझप पाय टाकूया म्हटलं तर तेही करवत नव्हत .
इथे प्रत्येक खंडासाठी , देशासाठी स्वतंत्र gallery आहे .

South East Asia च्या भारतीय gallery मध्ये अकराव्या शतकातील राजस्थान मध्ये सापडलेली रिद्धी सिद्धी सोबत असलेली उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे .
इसवी सन पूर्व ५० च्या काळातल सांची इथे सापडलेल यक्षिणीच्या पुतळ्याचे धड आहे .
चोला वंश काळातील महिषासुर मर्दिनी आणि भूदेवी यांच्या मुर्त्या आहेत . तसेच इथल्या चौदाव्या शतकातील इंडोनेशिया मधील प्रज्ञापरमीता ( बौद्ध देवता ) आणि महाकाळ यांच्या मुर्त्या लक्ष वेधून घेतात .

इतरही अनेक प्रसिद्ध पेंटिंग्स , ईजिप्शिअन ममीज , पुरातन काळची हत्यारे , नाणी , अलंकार अशा असंख्य गोष्टी इथे जतन करून ठेवल्या आहेत .
आणखी एक स्मरणात राहणारी गोष्ट म्हणजे Josiah McElheni या व्यक्तीने विसाव्या शतकात निर्माण केलेली काचेची चमत्कृती .
काचेला फुग्यांसारखे वेगवेगळे आकार देवून त्यांची अशी काही विशिष्ट रचना केली गेली आहे कि बघताना नजर पोचेल तिथवर फक्त हि रचनाच दिसते .

ह्या सर्वांवर लिहू तितकं कमीच आहे .
अशी असंख्य exhibits बघण्यात संपूर्ण दिवस खूपच कमी पडला .
सकाळी मुझियम उघडताच आत शिरलेलो आम्ही मुझियम बंद व्हायच्या पाच मिनिट आधी नाईलाजाने तिथून बाहेर पडलो ते पुढच्या बॉस्टन विझीट मध्ये इथल्या साठी चांगला आठवडाभर राखून ठेवायचा हे निश्चित करूनच .

Boston Tea party museum -
Boston मधलं आणखी एक सर्वात महत्त्वाचं मुझियम म्हणजे Boston Tea party museum .
हे मुझियम म्हणजे बॉस्टन चा मानबिंदू .
आपल्यावर जवळ जवळ दीड दोनशे वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी अमेरिकेवरही कब्जा करण्यासाठी तिथे सुद्धा आधी व्यापाराच्या निमित्ताने शिरकाव केला होता .
पण योग्य वेळी ह्याच्या विरुद्ध आवाज उठवला गेल्याने अमेरिकेला आपल्यासारखी गुलामी अधिक काळ सहन करावी लागली नाही .

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कोणताही कर न भरता ब्रिटिशर्स चहाचा व्यापार करत होते आणि ह्या विरुद्ध अमेरिकेत सर्वप्रथम आवाज उठवला गेला तो बॉस्टन मध्येच .
१६ डिसेम्बर १७७६ च्या रात्री Mrs Abigail ( First lady of the US ) यांच्या घरी झालेल्या मिटिंग मध्ये John Adams (Mrs Abigail चे पती ) , Samuel Adams आणि Paul Revere त्यांच्या नेतृत्वा खाली अत्यंत सुनियोजित कट करून ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी चे एकूण ४६ टन्स वजनाचे ३४२ चहाचे बॉक्सेस इथूनच समुद्रात रातोरात फेकले गेले होते .
ह्यामुळे ब्रिटीशांचं प्रचंड नुकसान झालं आणि Lexington इथे सर्वप्रथम ब्रिटीशर्स आणि बॉस्टन वासियांमध्ये युद्ध झालं .

ह्या मुझियम मध्ये त्या काळच्या Eleanor आणि Beaver या दोन नौकांची प्रतिकृती ठेवलेली आहे .
इथे मुझियम पाहतानाचा एक भाग म्हणून आपल्याला त्या ऐतिहासिक रात्रीचे एक patriot बनवून एका नाट्यात सहभागी केलं जातं .
त्या रात्री तिथे नक्की काय व कसं झालं असाव हे त्या नाट्यातून अत्यंत परिणामकारक रित्या आपल्यापर्यंत पोहोचत .

बोटीच्या तळमजल्यावर त्या काळातील खोल्या , केबिन , चहाचे मोठ मोठे खोके ठेवून तो काळ जिवंत केला आहे .
आपल्यालाही ते खोके समुद्रात कायला , जहाजाच्या तळ मजल्यावरून वर खेचायला देतात . हा एक अतिशय रोमांचकारी अनुभव होता .

ह्यानंतर आम्हाला एका बंद खोलीत नेण्यात आलं .
Mrs Abigail आणि ब्रिटिशांना सपोर्ट करणाऱ्या एका अमेरिकन कुटुंबातील वरिष्ठ अधिकाऱ्याची बायको यांच्या संवादातून त्या काळच्या सामान्य लोकांच्या समस्या , त्यांचा तिथल्या धनिकांशी चालू असलेला झगडा तिथे एका नाट्यातून दाखवला .
एका खोलीत सर्वांना बसवून मिट्ट काळोख करतात आणि समोर स्टेजवर २ बायका हि पात्रे रंगवतात .
नाटक संपल्यावर मात्र आपल्याला कळते कि ह्या बायका आणि स्टेज खरे नसून हि स्क्रीनवर चालू असलेली एक छोटीशी फिल्म होती .
आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर अक्षरशः भांबावलेले भाव होते इतक्या त्या स्त्रिया जिवंत खऱ्या वाटत होत्या .

नंतर पुढे दुसऱ्या एका खोलीत त्या काळच्या काही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत .
तिथे Samuel Adams ( patriot ) आणि एका ब्रिटीश अधिकाऱ्याची मोठी तस्वीर लटकवलेली आहे .
इथे आपल्याला त्या रात्रीनंतर ( १६ डिसेम्बर १७७३ ) काय काय घडामोडी घडल्या ह्याविषयी थोडक्यात सांगतात आणि अचानक त्या दोन तसविरीतील चेहरे जिवंत होऊन आपल्यासमोर तो सर्व संवाद सुरु करतात .
हा म्हणजे “Harry Potter” मध्ये जशी तसविरीतली माणस बोलतात चालतात अगदी तोच प्रकार होता .

मुझियमच्या मागच्या बाजूला Mrs Abigail’s tea room नावाची कॅफे आहे .
तिथे १७७३ सालच्या त्या रात्री समुद्रात जे पाच प्रकारचे चहा फेकले गेले होते त्यांची चव तुम्हाला चाखायला मिळते .
इथून बाहेर येताना आम्ही एका विलक्षण अनुभवाने भारावून गेलो होतो .

© नयना पिकळे
( क्रमश: )
( क्रमश: )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा