New Jersey ला असतानाच आम्ही राजू ताई बरोबर Ellis Island आणि Statue Of Liberty ला जावून आलो .
घरून सकाळी नऊच्या सुमाराला निघून आम्ही लिबर्टी स्टेट पार्क ला पोचलो .
तिथल्या Central Road Terminal ची देखणी इमारत पहिली .
तिथून Ellis Island वर जाण्यासाठी ferry केली .

मधला दिवस असूनही तिकिटांसाठी मोठी रांग होती .
बहुतेक सगळे शालेय विद्यार्थीच होते . पाचवी सहावी ची मुलं .
एका शिक्षिके सोबत जास्तीत जास्त फक्त ५ ते ६ मुलं होती .
शिक्षिका आणि मुलांच्या एकमेकांसोबत वागण्यात एक शिस्त होतीच पण आश्चर्य म्हणजे त्यांच्यात समवयस्कांमध्ये असतो तसा मोकळेपणा जाणवला .

अमेरिकेत फिरताना प्रत्येक ठिकाणी शाळेच्या पिकनिक साठी आलेली मुलं आणि टीचर्स दिसली .
पण प्रत्येकवेळी फक्त शिक्षिकाच दिसल्या ... शिक्षक एकही नाही . तिथे पुरुष शिक्षक कमी असतात का ते कळलं नाही .

आम्ही तिकीट online काढल असल्याने आमचं सर्वांचं फक्त अतिशय strict security checking झालं आणि मग फेरीतून Ellis Island साठी निघालो .
पैलतीरावर New York ची skyline अतिशय आकर्षक दिसत होती .

Ellis Island – एक छोटंसं बेट आहे आणि त्यावर एकंच रेखीव अशी देखणी इमारत .
अमेरिकेच्या इतिहासातल हे अतिशय महत्त्वाचं स्थान .
एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी ह्याच Ellis Island वरून उत्तर धृवाकडून एक कोटीच्या वर immigrants अमेरिकेत आले आणि कायमचे इथलेच झाले .

मात्र त्या सर्वांना सहजासहजी ह्या देशात प्रवेश मिळाला नाही .
त्यासाठी त्यांना अनेक दिव्यांतून जावं लागलं होतं .
अमेरिकेत शिरकाव मिळण्यासाठी त्यांना सर्वांना कितीतरी दिवस एका प्रचंड मोठ्या कक्षात प्रतीक्षा करावी लागली होती .
सर्वांची कसून वैद्यकीय तपासणी होत असे .
दिवसातून फक्त एकदाच मिळणारा एक छोटासा पाव आणि वाडगाभर पातळ सूप यावर ते तग धरून राहत असत .
हजारोंचा ह्या दरम्यान याच ठिकाणी मृत्यू देखील झाला .
ज्यांना अमेरिकेने आपल्यात सामावून घेतलं त्यांचासाठी हा Island of hope ठरला तर ज्यांना परवानगी नाकारण्यात आली त्या दुर्दैवींसाठी Island of tears .

आज त्या सर्वांच्या स्मृती प्रीत्यर्थ तिथे एक museum बांधलेलं आहे .
त्या काळी आलेल्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला हे अत्यंत परिणामकारण रित्या इथे एका ३० मिनिटांच्या documentory मध्ये दाखवल जातं .
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरचा तो भव्य कक्ष जिथे immigrants आपलं भवितव्यात काय वाढून ठेवलंय हे जाणून घेण्यासाठी तळमळत महिनोंमहिने काढत असत तिथे पाय ठेवताच अंगावर रोमांच आले .

तिसऱ्या मजल्यावर त्या काळच्या immigrants च्या वस्तू , कपडे , फोटो त्यांच्या नावासकट display केलेले आहेत .
तिथेच आजवर Ellis Island वरून अमेरिकेत आलेल्या प्रत्येकाची नावं रजिस्टर मध्ये नोंद केलेली आहे .

Ellis Island च्या थोडसंच पुढे ferry ने गेल्यावर Statue of Liberty आहे . सम्पूर्ण विश्वात स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा हा पुतळा .
३०५ फुटांचा आणि ४५०००० पौंड वजन असलेला हा तांब्याचा पुतळा फ्रांस ने अमेरिकेला १८८६ साली भेट दिला होता .
पुतळ्याच्या मुकुटाभोवतीची ७ किरणं म्हणजे पृथ्वीवरील ७ खंड . तिच्या पायाभोवती तुटून पडलेल्या बेड्या आहेत ज्या तिच्या स्वातंत्र्याच्या प्रतिक आहेत .
पुतळ्याच्या उजव्या हातात torch आहे आणि डाव्या हातातील tablet वर ४ july १७७६ हि तारीख कोरलेली आहे .
हे झालं statue चं technical वर्णन .

Ellis Island आणि Statue of Liberty दोन्ही प्रत्यक्षं पाहणं एक अवर्णनीय अनुभव होता .
तिथे दुपारी जेवताना एक गम्मत झाली .
सर्वात आधी म्हणजे जिथे खायला गेलो तिथे भिंतीवर सर्व मेनू लावला होता .
आम्ही counter वर जाऊन आम्हाला काय हवं ते सांगितलं तर त्या मुलाला काहीच कळेना .
शेवटी आम्ही मोबाईल वर फोटो काढून त्याला दाखवल्यावर त्याने “ohh panini” म्हणत हसत हसत आमची ओर्डर घेतली .
तसंच पुढे पैसे भरताना सतीशने एका पदार्थाच्या किमतीविषयी साधा प्रश्न विचारला तर काऊनटर वरची मुलगी उत्तर शोधण्यासाठी समोरच्या स्क्रीन मध्ये एवढी गढून गेली कि तिने हिशेब करायला १०/ १५ मिनिट लावली .

इथे रोज दिवसभर पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी येत असतात .
आम्ही गेलो त्यादिवशी वातावरण बऱ्यापैकी ढगाळ असल्याने हवेत गारवा होता .
पण पाऊस नसल्याने आम्हाला statue च्या चारीबाजूने असलेला सगळा परिसर मोकळेपणी फिरता आला .

आम्ही सगळी ट्रीप आटपून संध्याकाळी घरी पोचेतो साडेपाच वाजले होते तरी थकवा अजिबात जाणवत नव्हता .
मग राजुताईच्या घराच्या बाजूलाच असलेल्या woods मध्ये फिरायला गेलो . निर्जन तरीही निर्भय रस्ते , दोन्ही बाजूला गर्द हिरवे वृक्ष , माणसाचा जराही हस्तक्षेप न झालेला संपूर्ण निसर्ग .
लहानपणी Enid Blyton च्या The Magic Faraway Tree आणि The Enchanted Woods ह्या पुस्तकांनी घातलेली भुरळ अजूनही होतीच .
त्या पुस्तकातलं घरामागच forest , तिथल्या fairies , goblins आज इतक्या वर्षानंतरही कायमचं मनात घर करून आहेत . Oakhurst मधल्या ह्या woods मध्ये फिरताना जणू मी माझं कित्येक वर्षाचं स्वप्न प्रत्यक्षात जगत होते . अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहत होते .
अचानक कोणत्यातरी झाडामागून एखादी fairy किंवा goblin डोकावेल असं कितीदातरी मनात येत होतं .

तो दिवस आणि ते वातावरण मी आयुष्यात विसरणार नाही .
यापुढे जेव्हा जेव्हा अमेरिकेत जाईन तेव्हा दरवेळी एकदा तरी तिथे जायचंच हे मनोमन ठरवूनच टाकलं .

© नयना पिकळे
( क्रमशः )
( क्रमशः )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा