गुरुवार, २ जानेवारी, २०२५

अर्चितच्या अमेरीकेत आम्ही - ४

 अर्चितच्या convocation ceremony साठी १६ मे च्या पहाटे आम्ही New Jersey हून JFK airport वर आलो आणि तिथून Buffalo साठीची फ्लाईट पकडली .

अर्चितसुद्धा बॉस्टनहून आम्ही पोचायच्या तासभर आधी तिथे पोचून आमची वाट पाहत होता .
Buffalo विमानतळ नीटनेटक छोटंसं आहे .
इथून आम्ही Uber करून बुक केलेल्या हॉटेल रूम वर गेलो .
अमेरिकेत सगळीकडे नळाला गरम आणि थंड पाणी येण्याचं प्रयोजन केलेलं असत .
आपल्या सारखा एक्वागार्ड वगैरे प्रकार तिथे नाही .
सरसकट सगळीच नळाच पाणी डायरेक्ट भरतात , पितात .
सुरुवातीला काही दिवस थंडी सहन होत नसल्याने मी सकाळी उठल्यावर बाथरूम मधल्या गरम पाण्याने गुळण्या करायचे .
एक दोन दिवस ते गरम पाणी प्यायले सुद्धा .
पण अर्चित कडून कळल कि इथल्या गरम पाण्यात lead मिक्स केलेलं असत .
त्यामुळे फक्त हात तोंड धुवायचे सोडल्यास ते poisonous पाणी कोणीही प्यायला किंवा इतर कशाला वापरत नाहीत .
खाद्य पदार्थ धुवायला देखील नाही .
झालं , मी गेले दोन चार दिवस काय करत होते ते मुर्खासारख मीच माझ्या तोंडाने सर्वांना सांगितलं असल्याने दिवसभर सर्वांचा ओरडा खाल्ला .
Buffalo ला आल्याच्या दिवशीच रात्री अर्चितच्या university ने students आणि parents साठी Mariott हॉटेल मध्ये डिनर पार्टी अरेंज केली होती .
इथे सगळ्या अर्चितच्या प्रोफेसर्सची ओळख झाली .
इतरांकडून आपल्याच लेकाबद्द्ल कौतुकाचे बोल ऐकताना आधीच भरपूर मांस असलेल्या माझ्या देहावर आणखी मुठ मुठ भरून मांस चढलं ( त्यावेळी जे माझं वजन वाढलं ते अजून उतरलेलं नाहीये हो . नाहीतर तुम्हाला वाटेल कि मी अमेरिकेत केक्स आणि आयस्क्रीम खाऊन जाडी झालेय म्हणून ) .
अमेरिकेतल्या Mariott हॉटेल मध्ये डिनर म्हटल्यावर तिथे काहीतरी छान वेगळं खायला मिळेल म्हणून उत्सुकता होती . पण हाय रे दैवा . ह्या अमेरिकनांनी बाकी सर्व क्षेत्रात प्रगती केली पण खादाडीच्या बाबतीत भारताचा हात ते कधीच धरू शकणार नाहीत . पंचतारांकित हॉटेल मध्ये डिनरला काय होत तर ऑरेंज ज्यूस , पम्पकिन सॉस , उकडलेले गाजर , फरसबी , फ्लॉवर आणि अशाच इतर भाज्या , mashed potatoes , turkey आणि पाव . साध अंड किंवा चिकन देखील नसावं याचं आश्चर्य वाटलं . अर्चितला विचारलं तर म्हणे चिकन अंडी हे अमेरिकनांचं रोजचं खाण . आज स्पेशल सेलिब्रेशन म्हणून turkey होती . स्वीट डीश म्हणून एप्पल पाय .
जेवून परत आमच्या रूम जवळ आलो आणि मस्त आजूबाजूच्या एरियात पाय मोकळे केले . रस्त्यावर चीटपाखरू देखील नव्हत पण जराही भीती वाटली नाही .
थंड झोंबरा गारवा आणि निसर्गाचं आल्हाददायक असं एक वेगळंच रुपडं . आकाशात थोडा मोठाच दिसणारा ठसठशीत असा चंद्र .
भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या ह्या गावात मी सध्यातरी पूर्ण रमलेले होते .
दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी करूनच नाश्त्यासाठी नऊच्या सुमाराला बाहेर पडलो तर आजूबाजूची बहुतेक हॉटेल्स उघडलीच नव्हती .
समोरच्या पेट्रोल पंप जवळ एक दुकान होतं तिथे मग मस्त गरमागरम मफ़ीन्स आणि एक मोठ चिप्स चं पाकीट घेतलं सोबत कॉफी . इथे प्रत्येक वेळी कॉफी चा small कप हवा हे आवर्जून सांगावं लागतं नाहीतर जो कप मिळतो तो दिवसभरातही पिऊन होणार नाही अशा अवाढव्य साईजचा असतो .
इथून आम्ही परत अर्चितच्या university मध्ये गेलो .
तिथे मुलांची आणि त्यांच्या पालकांची झुंबड उडाली होती .
सगळेच नटून थटून तयारीत आलेले .
बहुतेक भारतीय बायकांनी साड्या घातल्या होत्या आणि त्यावरून एकमेकांना ओळखणं सोप्प जात होतं .
साधारण दीड , दोन हजार लोकं आरामात बसू शकतील इतक्या प्रशस्त हॉल मध्ये आम्हा सर्व पालकांना बसवण्यात आलं .
मुलांना convocation चा ड्रेस घालून दुसरीकडे जमायला सांगितलं होतं . निळी आणि सोनेरी रंगसंगती साधून हॉल सुरेख सजवला होता .
स्टेज च्या खाली मधोमध एक रुबाबदार सोनेरी buffalo चा पुतळा लक्ष वेधून घेत होता .
बरोब्बर अकरा वाजता वेगवेगळ्या stream मधली सगळी मुलं हॉलच्या side ways मधून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एका मागोमाग आली आणि आमच्याच समोर , त्यांच्या साठी खास आरक्षित केलेल्या जागांवर येवून बसली .
सुरुवात अमेरिकेच्या National Anthem ने झाली .
मग University च्या Dean चं आणि इतर काही मुख्य प्रोफेसर्सची भाषण झाली .
आणि मग ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तो सोहळा सुरु झाला .
प्रत्येक मुलाचं नाव घेवून त्याचं योगदान आणि वैशिष्ट्य सांगून त्याला गौरवलं जात होतं .
अर्चितचं नाव पुकारलं गेलं तेव्हा उर अभिमानाने आणि डोळे नकळत पाण्याने भरून आले .
जवळ जवळ चारशेच्या आसपास तरी विद्यार्थी नक्कीच होते .
तरीही कुठेही गोंधळ , गडबड नाही .
अतिशय सुनियोजित असा तो भव्य सोहळा पाहून आम्ही दिपून गेलो .
कार्यक्रमानंतर सर्वांसाठी रिफ्रेशमेंटस चा प्रबंध केला होता .
ह्यावेळी मात्र चविष्ट असे starters , dips , चिप्स , ज्युसेस आणि पेस्ट्रीज होत्या .
दुपारी मग university चं अफाट campus फिरलो . कॅम्पस वरचा lake पहिला .
गेल्या winter मध्ये पूर्ण बर्फाळलेल्या ह्या लेक चा अर्चित ने फोटो पाठवलेला तेव्हा पासून तो बघायची खूप उत्सुकता होती .
आजवर अपरिचित असलेल्या वेगवेगळ्या फुलांनी फुललेली झाडे पहिली कि त्यांच्या सोबत फोटो काढल्याशिवाय राहवत नव्हतं .
फिर फिर फिरलो , पाय थकले पण मन मात्र अजूनही थकलं नव्हतं .
जिथे माझ्या मुलाने मधली दोन वर्ष एकट्याने घालवली तिथली प्रत्येक गोष्ट त्याच्या सोबत बघावीशी , अनुभवावीशी वाटत होती .
तो कुठून ग्रोसरी विकत घ्यायचा , विकेंड ला कुठे कुठे फिरायचा , तो इंडिअन हॉटेलवाला जो ह्या इंडिअन मुलांना प्रेमाने बोलावून दिवाळी , होळी ला आवर्जून मोतीचूर लाडू , जिलेबी खायला द्यायचा , अभ्यास करायला university च्या Union Lobby मध्ये अर्चित कुठे , कोणत्या टेबल वर बसायचा .... हे सारं सारं आणि इतर अनेक गेल्या दोन वर्षातल्या आमच्या फोनवरच्या संभाषणात आलेल्या गोष्टी मी आठवून आठवून अर्चितला विचारत होते आणि तोही तितक्याच उत्साहाने आम्हाला सगळीकडे फिरवून त्या दाखवत होता .
जणू आपापल्यापरीने आम्ही मधला दोन वर्षांचा दुरावा मिटवायचा प्रयत्न करत होतो .
रात्रीचे साडेआठ वाजले तरी आमची भटकंती चालूच होती . एक सांगायचं राहिलंच ... या सीजन मध्ये रात्री आठ वाजेपर्यंत आकाशात सूर्य दिसतो आणि चक्क नऊ वाजेपर्यंत छान उजेड असतो .
त्यानंतर आम्ही एका मेक्सिकन रेस्टोरेंट मध्ये जेवून तना मनाने तृप्त होऊनच रूमवर परतलो .

© नयना पिकळे
( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताडोबा - जंगल सफारी

   ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल...