गुरुवार, २ जानेवारी, २०२५

अर्चितच्या अमेरिकेत आम्ही - ५

 Convocation च्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ मे च्या शनिवारी सकाळी उठून आम्ही नायगारा falls पाहायला गेलो .

Buffalo ला ज्या हॉटेल मध्ये उतरलो होतो तिथून केवळ १५ मिनिटांच्या drive वर जग प्रसिद्ध नायगारा धबधबा होता .
सकाळी uber करून निघालो .
त्याआधी हॉटेलची रूम सोडली आणि सगळं समान अर्चित आधी रेंट वर राहायचा त्या घरी काही तासांसाठी त्याच्या मित्राच्या खोलीत ठेवलं .
आजवर नायगारा म्हणजे एकच धबधबा असं मी समजत होते पण नायगारा म्हणजे एकूण तीन मुख्य धबधबे आहेत असं अर्चित ने सांगितलं .
Horseshoe falls जो कॅनडा मधून नीट पाहता येतो आणि American falls आणि Bridal Veil falls जे अमेरिकेच्या बाजूने आहेत .
नायगाराला जायचा रस्ता चित्रात रेखाटलेल्या एखाद्या गावच्या रस्त्यासारखा सुरेख होता आणि वातावरण खूपच आल्हाददायी .
त्यात काही क्षणात आपण जगातील एक आश्चर्य पहाणार आहोत ही भावना .
जसजसा नायगारा जवळ येऊ लागला तसतसं हळुहळु रस्त्याच्या डाव्या बाजूला धुक्यासारखं काहीतरी दिसू लागलं .
एक संथ बारीक नदी देखील आमच्या सोबत येत असलेली जाणवलं .
पाण्याचा आवाजही हळुहळु वाढत चालला होता पण अजूनही ते भव्य रूप काही नजरेच्या टप्प्यात येत नव्हतं .
आम्ही Uber मधून Goat Island वर उतरलो .
अतिशय बोचरा वारा अंगाला झोंबू लागला आणि जाणवलं कि उत्साहाच्या भरात माझा स्वेटर अर्चितच्या रूमवरच राहिला होता .
मग काय माझी दीनवाणी अवस्था पाहून सतीशने आपला स्वेटर काढून मला दिला आणि स्वतः माझ्यासाठी थंडीमुळे झालेले हाल सहन केले .
अर्थात जेव्हा जेव्हा आणि जितक्या वेळा संधी मिळेल तेव्हा माझ्या वेंधळेपणाचा उद्धार केलाच .
मला मात्र दिवसभर सॉरी सॉरी म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता . असो .
आजूबाजूला नजर टाकली तर एक सुरेख पायऱ्या पायऱ्या असलेली बाग होती . पाण्याच्या खळखळाटा बरोबरच पक्षांचा गोड किलबिलाट सुद्धा ऐकू येत होता .
बाजूलाच वाहणारा नदीचा स्रोतहि आता दिसत होता .
पण अजूनही जे हवं ते काही दिसेना .
तिथे गेल्यावर आधी तिकीटं काढली .
तिथे Cave of the winds आणि Maid of the mist अशा दोन tours असतात .
पण आम्ही गेलो त्यावेळी नदीच्या तळाचा बर्फ पूर्णपणे न वितळल्याने Maid of the mist ची tour सुरु झाली नव्हती .
Cave of the winds साठी आम्हाला पिवळे रेनकोट मिळाले जे घालून आम्ही लिफ्ट ने जवळ जवळ दोनशे फुट खाली गेलो .
तिथून एका tunnel मधून बाहेर पडून संपूर्ण लाकडी असलेल्या हरिकेन डेक वर पोचलो .
आणि आतापर्यंत जे पाहायला डोळे आसुसले होते ते नायगाराचं विशाल , महाकाय रूप आमच्या समोर होतं .
आम्ही विश्व विख्यात Bridal Veil falls च्या अगदी काही फूट अंतरावर उभे आहोत हे जाणवलं आणि अंगावर रोमांच आले .
अक्षरशः आमच्या वरच Bridal Veil falls धो धो कोसळत होता .
रेनकोट असूनही तना मनाने आम्ही चिंब भिजून तृप्त झालो .
नायगारा धबधब्याचा जो horseshoe सारखा आकार आहे तो फक्त कॅनडातूनच पाहायला मिळतो .
म्हणून नायगाराचं कॅनडाच्या बाजूने दिसणारं रूप जास्त सुरेख आहे असं म्हणतात .
कसं शक्य आहे ? एकाच निसर्गाची दोन रूपं .
आई एकवेळ आपल्या लेकरांमध्ये डावं उजवं करेल पण निसर्ग नाही करणार .
व्यावहारिक मापदंड लावायचे तर कॅनडाची बाजू असेलही जास्त चांगली पण अमेरिकेच्या बाजूने दिसणारं नायगारा चं रूप देखील निर्विवाद पणे अतिशय लोभस विस्मित करणारं असंच आहे .
तिथल्या skywalk वरून नायगाराचा दिसणारा विस्तार केवळ अवर्णनीय .
प्रत्येक कोपऱ्यावर बदलणारं धबधब्याचं देखणं रूप , नदीचं ते अवाढव्य पात्र , प्रचंड अलौकिक असा तो प्रपात पाहून निसर्गाच्या ह्या रूपापुढे परत परत नतमस्तक व्हायला होतं .
निसर्गाची एक आगळी अनोखी किमया पाहायला मिळत होती .
कितीतरी वेळ निश्चल मनाने ते रूप डोळ्यात , मनात साठवून घेतलं तरी समाधान होत नव्हतं .
एका वेगळ्याच भारावल्या मनस्थितीचा अनुभव इथे येतो .
नायगाराच्या पैलतीरावर कॅनडा मधल्या Toronto शहराची skyline दिसत होती .
अमेरिका आणि कॅनडा ह्या दोन बलाढ्य देशांच्या सीमेवर आपण उभे आहोत हे लक्षात येताच एक वेगळंच फिलिंग आलं .
नदीच्या पाण्यात तसेच काठावर पूर्णपणे माणसाळलेले sea gulls निर्भयपणे प्रचंड प्रमाणात बागडत होते .
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या angles ने आम्ही स्वतःचे नायगारा सोबत असंख्य फोटो काढून घेतले .
बाजूच्या रम्य बगिच्यात मनसोक्त हिंडून झाल्यावर तिथेच थोडं खाऊन घेतलं .
तिथून पाय निघता निघत नव्हता पण इलाज नव्हता .
त्यानंतर अर्चितच्या रूमवर परतण्यासाठी Uber करण्याकरता फोन हातात घेतला तर काय .
काही केल्या नेट ची रेंजच मिळेना .
दोन देशांच्या सीमेवर असल्याने तिथे हा प्रोब्लम नेहमीच असतो हे कळलं .
मग आता काय करायचं ? कशीबशी खूप वेळाने एके ठिकाणी रेंज मिळाली आणि आम्ही एकदाचे रूमवर पोचलो .
तिथे आदिती ( सतीशच्या पुतण्याची विराजची बायको ) आम्हाला पिकअप करायला येणार होती .
ती Buffalo हून एका तासाच्या अंतरावर असलेल्या Rochester मध्ये राहते .
Buffalo ते Rochester रस्ता सुद्धा असाच रुंद , शांत , दोन्हीबाजूला झाडी , खुली मैदानं आणि अधूनमधून टुमदार सुबक घरं असलेला असा होता .
वाटेत रस्ता ओलांडणारी कितीतरी हरीणं दिसली .
रस्त्यात दोन तीन ठिकाणी मेलेली हरीणं देखील पहिली .
इथल्या गाड्या फुल स्पीड मध्ये असल्याने अचानक मध्ये जनावर आले तर गाडी थांबवणे अवघड जाते .
त्यामुळे हि अशी दृश्यं इथे नेहेमीच पाहायला मिळतात असं कळलं .
इथलं शासन ह्या विषयी काही करत का हे मात्र कळलं नाही .
Rochester ची आदिती ची apartment अतिशय सुबक , सुटसुटीत , हवं तेवढंच सामान नीट नेटकेपणाने लावलेली अशी होती .
तिथे तिच्या सोबत मलाय ( Malai – त्यांची pet कुत्री ) राहते .
मलाय म्हणायचं मलई नाही हे मला अर्चित दरवेळी सांगतो आणि मुद्दाम त्याला चिडवायला मी नेहमी तिचा उच्चार मलई असाच करते .
विराज सुद्धा आम्हाला भेटायला Manhattan वरून खास तिथे आलेला .
Manhattan ला असलेल्या Inday ह्या नावाजलेल्या hotel chain चा owner Viraj आणि त्याने Rochester ला स्वतः बनवलेल्या खास brussels stir fry आणि चविष्ट चिकनची चवच काही और होती .
सुरेख जेवण आणि अनलिमिटेड गप्पा टप्पा .
हाही दिवस खूप छान गेला .
Rochester हून दुसऱ्या दिवशी आम्ही परत Buffalo airport वर आलो आणि Boston ला जायची फ्लाईट घेतली .
अर्चित सध्या Boston ला राहत असल्याने Boston हाच आमचा अमेरिकेतला शेवटचा टप्पा होता .
इथून पुढचे तीनही आठवडे आम्ही Boston मध्ये सतीशच्या भाच्याच्या अमित च्या घरी राहिलो .

© नयना पिकळे
( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताडोबा - जंगल सफारी

   ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल...