Newark airport प्रचंड मोठा असल्याने आम्हाला अनेक जणांनी सासऱ्यांसाठी ( ते ८६ वर्षांचे आहेत ) व्हील चेअर घ्यायला सुचवलेलं . खरंतर ते तब्येतीने ठणठणीत असल्याने त्यांचा व्हील चेअरला विरोधच होता . पण आम्ही व्हील चेअर घेतली आणि मोठी चूक केली .
जवळ जवळ पन्नासच्या वर लोकांनी व्हील चेअर बुक केली होती . सर्वांना तिथले कर्मचारी व्हील चेअर वर एका रांगेत बसवत होते . पण नंतर पुढे काहीच हालचाल नाही . बरं , आम्ही व्हील चेअरला हात लावला तर लगेच आम्हाला थांबवायचे . म्हणे “ it is our responsibility ” . अर्धा तासावर झाला तरी आम्ही जहां थे वही ....
त्यांना विचारावसं वाटत होतं कि बाबांनो तुमच्या कडे responsibility निभावण्याचा मुहूर्त वगैरे असतो का ? पण अनोळखी जागा म्हणून हिम्मत नाही केली . कारण माझ्या आधीच हे कार्य इतर प्रवाशांनी केलं तेव्हा त्यांना अत्यंत उद्धट उत्तर मिळालेली पाहिली .
मग खूप वेळाने मुंगीच्या गतीने सर्व व्हील चेअर वाल्यांना लिफ्ट मधून दोन/दोन करून वर नेण्यात आल . त्यानंतर immigration , त्यानंतर luggage कलेक्ट करण . ह्यातच आमचा एक अख्खा तास गेला .
अद्भूत , अलौकिक अशा अमेरिकेबद्दल जे कौतुक ऐकलं होत त्याला नाही म्हटल तरी थोडासा चरा गेलाच . अमेरिके बद्दलचं माझं first impression ह्या प्रसंगाने अत्यंत प्रतिकूल झालं .
अद्भूत , अलौकिक अशा अमेरिकेबद्दल जे कौतुक ऐकलं होत त्याला नाही म्हटल तरी थोडासा चरा गेलाच . अमेरिके बद्दलचं माझं first impression ह्या प्रसंगाने अत्यंत प्रतिकूल झालं .
पण बाहेर आले आणि मनातलं सगळं किल्मिष कुठच्या कुठे पळालं . कारण चक्क अर्चित आमच्या समोर हसत हसत उभा होता . क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना . त्यावेळची मनाची झालेली अवस्था मात्र आता इथे सांगता येणं अशक्य . हसू आणि आसू एकत्र अनुभवण्याचे जे काही मोजके क्षण असतात त्यातला तो क्षण होता . आम्हाला surprise देण्यासाठी म्हणून तो मुद्दाम वीकेंड साधून आला होता . तो दोन दिवस आमच्या सोबत New Jersey ला राहिला आणि बॉस्टनला परतला .
Newark airport वर आम्हाला घेण्यासाठी सतीशची चुलत बहिण आणि तिचे मिस्टर आले होते . कार मधून त्यांच्या घरी जाताना तिथल्या गुळगुळीत रस्त्याचं , multitiered flyovers , दिमाखदार टनेल्स यांचं दर्शन होत होतं .
तिथे रस्त्यांना माणसांची नावं नाहीत तर नंबर दिलेले आहेत . हायवे वरून ठराविक अंतरांवर आतल्या भागात जायला एक्झीट्स आहेत .
लेफ्ट टर्न घ्यायचा असेल तर सरळ लेफ्ट न मारता राईट मारून गोल वळण घेऊन परत हायवे वर येऊन सरळ जायचं . ह्याला Jughandle म्हणतात . हि पद्दत माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण USA मध्ये फक्त New Jersey मध्येच आहे .
तिथे रस्त्यांना माणसांची नावं नाहीत तर नंबर दिलेले आहेत . हायवे वरून ठराविक अंतरांवर आतल्या भागात जायला एक्झीट्स आहेत .
लेफ्ट टर्न घ्यायचा असेल तर सरळ लेफ्ट न मारता राईट मारून गोल वळण घेऊन परत हायवे वर येऊन सरळ जायचं . ह्याला Jughandle म्हणतात . हि पद्दत माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण USA मध्ये फक्त New Jersey मध्येच आहे .
एक्झिट घेऊन आतल्या रेसिडेंशिअल एरियात आल्यावर दोन्ही बाजूंना चित्रातल्या सारखे सुबक आखीव रेखीव बंगले . प्रत्येक बंगल्या समोर वेगवेगळया रंगांची फुलझाडे . Pine , Oak , Ivy आणि Maple चे हिरवेगार वृक्ष आणि लालसर मातकट रंगाची पाने असलेले Japanese Maple सर्वत्र दिसत होते .
रस्ते अतिशय स्वच्छ , प्रत्येक घरासमोरचे lawn अतिशय निगुतीने mowing करून साफ ठेवलेले . आजपर्यंत फक्त सिनेमात दिसणारी देखणी स्वच्छ दृश्ये डोळ्यासमोर प्रत्यक्ष साकारली होती .
New Jersey मध्ये आम्ही दोन दिवस Oakhurst मध्ये Monmouth County इथे राहिलो . घरी गेल्या गेल्या राजू ताईने ( सतीशची चुलत बहिण ) बनवलेला गरमागरम नाश्ता करून आम्ही फ्रेश झालो . मग गप्पा , त्यांच घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर पहिला आणि परत पोटभर जेवून एक मस्त झोप काढली .
संध्याकाळी त्यांच्या घराच्या जवळ १५ मिनिटांवर असलेल्या बीच वर गेलो . समोर दिसणारा समुद्र आपला इंडिअन ओशियन किंवा अरेबियन महासागर नसून अटलांटिक ओशियन आहे हे मनात ठसवत होते . बीच जवळची ती एरिया म्हणजे जणू मुंबईचे मरीन ड्राईव्ह . तिथल्या बहुतेक धनिकांची Holiday Homes तिथे आहेत . प्रत्येकाने आपल्या Mansion भोवतीच्या किनाऱ्याला fencing करून समुद्राला जणू खेचून पार आपल्या घरापर्यंत आणल आहे .
रस्त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र होता . जर एखाद्या मोठ्या नौकेला दुसऱ्या बाजूला जायचे असेल तर रस्त्याचाच काही भाग आ वासून फाटका सारखा उघडायची व्यवस्था केली होती . नौका आली कि रस्त्यावरील traffic थांबवून हे रस्ता रुपी फाटक उघडतं . नौका दुसऱ्या बाजूला गेली कि परत रस्त्याच्या दोन्ही बाजू परत खाली येत असत आणि traffic सुरु होई . आम्ही लांबून हा प्रकार पहिला . पण नंतर जवळ गेलो असता परत नौका न गेल्याने फोटो काढता आला नाही .
बीच वर असतानाच भुरूभुरू पाऊस सुरु झाला . भारतात जून महिन्यात हजार मिनतवाऱ्या करूनही अजून दर्शन न दिलेला पाऊस इथे मात्र पहिल्या दिवशीच आमच्या स्वागताला हजर झालेला . पावसात भिजायला मिळणार म्हणून आनंद झाला खरा पण त्याचबरोबर असा काही सोसाट्याचा वारा सुटला कि स्वेटर घातलेला असूनही अक्षरशः हुडहुडी भरली आणि कधी एकदा कार मध्ये जाऊन बसतो असं झालं . मग तिथे जास्त थांबलो नाही . कार मधूनच beach चा एक फेरफटका मारला आणि घरी परतलो .
घरी टीव्ही वर weather forecast पाहिलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा heavy rains आणि thunderstorm चा इशारा दिला होता . पण गम्मत म्हणजे आपला भारतातला रिमझिम पाऊस हा US मधला heavy rains असतो आणि एखाद दुसरी वीज चमकली कि त्याला thunderstorm म्हणायची पद्धत आहे हे काही दिवसांनी आमच्या लक्षात आलं . पण पाऊस पडताना जो काही वारा सुटायचा तो मात्र अतिशय बोचरा थंड असायचा .
अमेरिकेची आणखीन एक गंमत म्हणजे इथलं weather , weather forecast च्या शब्दा बाहेर कधीच जात नाही . Forecast मध्ये जर सांगितलं कि दुपारी तीन ते पाच पाऊस पाडणार तर पावसाची काय बिशाद कि तो तीन ला पाच मिनिट कमी असताना पडेल ?
आम्हाला ह्या अचूक forecast चा पुढे सगळीकडे फिरताना खूप फायदा झाला . आम्ही weather sunny किंवा cloudy असलं कि बाहेर पडायचो आणि पाऊस यायच्या आत घरी परतायचो .
आम्हाला ह्या अचूक forecast चा पुढे सगळीकडे फिरताना खूप फायदा झाला . आम्ही weather sunny किंवा cloudy असलं कि बाहेर पडायचो आणि पाऊस यायच्या आत घरी परतायचो .
इथला पाऊस जेवढा शिस्तीचा तितकीच इथली माणसं सुद्धा शिस्तीची . Newark airport वरचा तो एक वाईट अनुभव सोडल्यास पुढे कुठेच परत तसा अनुभव आला नाही .
इथल्या हसतमुख , अदबशीर माणसांचं खरंच कौतुक वाटतं . बस मध्ये चढताना अगदी बस ड्रायवरला सुद्धा मनापासून छान ग्रीट करून त्याच्याशी दोन वाक्य तरी बोलणारच , कुणी काही विचारल तर सांगायला तत्पर . विचारल्या शिवाय मात्र इथे कोणीही कोणाच्याही वैयक्तिक बाबीत नाक खुपसत नाही . अगदी समोरचा खाली पडला तरी “ Do you need any help ?” असं विचारतात आणि पडलेल्याला मदत हवी असेल तरच मदत करतील किंवा त्याच्या नकाराला मान देवून सरळ निघून जातील .
नंतरचे दोन तीन दिवस New Jersey मध्येच राहत असलेल्या माझ्या मावस बहिणीकडे ( Edison )व मावस भावाकडे ( Piscataway ) आम्ही राहायला गेलो . बाहेर पाऊसच असल्याने माझ्या मावस बहिणीने आम्हाला तिथले शक्य तितके malls फिरवले . कारण malls मध्ये सगळीकडे heaters असल्याने पावसात फिरायला सर्वात सुरक्षित .
© नयना पिकळे
( क्रमशः )
( क्रमशः )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा